आदिवासी कल्याण मंत्री श्री. रमेश तवडकर यांचा संदेश

आदिवासी कल्याण मंत्री यांचा संदेश

 


श्री. रमेश तवडकर

 

दारिद्र्य व शोषण, आर्थिक व तांत्रिक मागासलेपण, सामाजिक-सांस्कृतिक व्यंग या गोव्यातील आदिवासी समुदायाच्या काही समस्या आहेत. आपल्या स्वत:च्या भूमीपासून वेगळे झालेल्या आदिवासी समुदायाकडे दुर्लक्ष होणे सुरूच आहे. गोव्यातील आदिवासींचा सांस्कृतिक इतिहास हा दीर्घ व समृद्ध आहे आणि त्यांनी गोव्याच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक विकासात सातत्याने योगदान दिले आहे. आमच्या आदिवासी समुदायातील वंचित सदस्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि गोव्यातील अनुसूचित जमातींच्या उन्नतीसाठी अधिक चांगल्या सेवा पुरविण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील.

Scroll to Top